दिलासा : आर्यन खानची अखेर जामिनावर सुटका
मुंबई : तब्बल 27 दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला असून, तिथून तो मन्नत या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाला. यावेळी आर्थर रोड तुरुंगाबाहेर शाहरूख खानच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शाहरुख खानही सकाळी आर्थर रोड तुरुंगामध्ये आला होता. 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील आलिशान क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने धाड टाकली होती. त्यावेळी एनसीबीने आर्यन खानला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. आर्यन खानला गुरुवारी हायकोर्टाने जामीन मंजूर केला होता मात्र शुक्रवारी जामिनाचे कागद योग्य वेळी तुरुंगात न पोहोचल्याने आर्यन खानची मुक्तता होऊ शकली नव्हती. दरम्यान, शनिवारी सकाळी तुरुंगातील अधिकार्यांनी जामिनाचे कागद घेण्यासाठी आर्थर रोड तुरुंगाबाहेर आले होते. आर्यन खानच्या जामिनाचे कागद याच पेटीत ठेवले होते.12 – आरोपी असे कुठलेही कृत्य करणार नाही, ज्यामुळे कोर्टाच्या कार्यवाहीवर अथवा आदेशांवर विपरीत परिणाम होईल.



