एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने तरुणीच्या आईवरच झाडली गोळी
नवी दिल्ली : एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाने तरुणीचं लग्न ठरलं म्हणून त्याने तिच्या आईवरच गोळी झाडली. मध्यप्रदेशात ही घटना घडली. तरुणीच्या आई आणि नातेवाईकांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलिसांत देखील याबाबत तक्रार करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष आगश्या असं या तरुणाचं नाव असून त्याचं तरुणीवर गेल्या दीड वर्षांपासून प्रेम होतं. पण तिचं लग्न ठरल्याचं समजताच त्याने तरुणीच्या घरच्या लोकांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेने परिसरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
एकतर्फी प्रेमातून गोळीबार
आरोपी संतोश आगश्या याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझाद नगर पोलीस ठाणे परिसरातील श्रीनगरमध्ये एका तरुणाचं एकतर्फी प्रेम होतं. त्यामुळे त्याने तरुणीच्या घरी जाऊन गोळीबार केला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस अधिकारी इंद्रमणी पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

