लग्न करून न दिल्याने माथेफिरू मुलाने केली वडिलांची हत्या
मालेगाव तालुक्यातील जऊळका येथील घटना
मालेगाव : लग्न करून देत नाहीत म्हणून एका तरुणाने पित्याची निर्घृण हत्या केल्याची घटना मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे शुक्रवारी रात्री घडली.
माझे लग्न का करून देत नाही म्हणून जऊळका येथील प्रमोद धर्मा भारती (27) याने शुक्रवार, 5 नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान वडील धर्मा भारती (65) यांच्यासोबत वाद घालत वडिलांच्या डोक्यात कुर्हाडीने डोक्यावर पायावर वार करून गंभीर जखमी केले.
मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
मृतकाची सून संजीवनी महादेव भारती या महिलेने जऊळका पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या धर्मा यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान धर्मा भारती यांचा रात्री दोन वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. त्यावरून पोलिसांनी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी मुलगा प्रमोद यास तत्काळ अटक केली. पुढील तपास ठाणेदार आजिनाथ मोरे व सहकारी करत आहेत.

