लग्नाचे आमिष दाखवून 25 वर्षीय महिलेवर अत्याचार


मंगळवेढा : लग्नाचे आमिष दाखवून 25 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला तसेच मारहाण व दमदाटी करण्यात आली. या प्रकरणी मुंढेवाडी येथील आकाश सिद्धेश्वर गडहिरे, छाया सिद्धेश्वर गडहिरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडीता बारामतीची रहिवासी
पीडित महिला तथा फिर्यादी ही बारामती येथील असून आरोपीने तिच्या राहत्या घरी जाऊन तू माझ्या शेजारी बस, मला तुझ्याशी बोलायचे आहे असा बनाव करून पीडीतेचा विनयभंग केला व 12 एप्रिल ते 2 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत मुंढेवाडी येथे लग्नाचे अमिष दाखवून घराच्या पाठीमागील शेतात वेळोवेळी अत्याचार केला असल्याचे पीडीतेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पीडीतेने आरोपी आकाश यास लग्नाबाबत विचारणा केली असता पिडीतेस आई छाया व आरोपी मुलगा या दोघांनी दमदाटी करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमुद आहे. आधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक सत्यजीत आवटे हे करीत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त मिल्ट्रीमॅनचा वढोदा जंगलात खून 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !