मोदीजी, देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी? नवाब मलिक यांचा सवाल


मुंबई : पंतप्रधान मोदी सरकारवर टीका करण्याची संधी विरोधकांनी साधली असून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आज पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने साधली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली असून ते म्हणाले की, मोदीजी, तुम्ही त्यावेळी म्हणाला होता मला भर चौकात शिक्षा द्या. मोदीजी, आम्ही विचारत आहोत की तो कोणता चौक आहे आणि देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी? असे मलिक माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

अनेकांचा झाला मृत्यू
नोटबंदीच्या निर्णयावर टीका करत असताना मलिक म्हणाले, नोटबंदीमुळे संपूर्ण देशात हाहाःकार माजला होता. नोट बदलण्यासाठी लोकांना रांगेत उभं राहावं लागलं होतं, अनेकांचा त्यात मृत्यू झाला आणि त्यानंतर मोदीजी म्हणाले होते की, मला तीन महिन्यांचा वेळ द्या. पण पाच वर्षे झाली ना काळा पैसा नष्ट झाला ना भ्रष्टाचार, ना दहशतवाद संपला. पण नोटबंदीमुळे बेरोजगारी वाढली. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था हादरली. आज या निर्णयाला पाच वर्षे झाली.

क्रांती रेडकरची बहीण ड्रग्ज व्यवसायात?
गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सतत आरोप करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरवर निशाणा साधला आहे. क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलेली आहे, पुण्यात ड्रग्जचं प्रकरण प्रलंबित असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडेंनी या प्रकरणात उत्तर द्यावं, असंही नवाब मलिक म्हणाले नव्या वादाला आणखी तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !