एक कोटींच्या विम्यासाठी त्याने रचला मृत्यूचा बनाव मात्र घडले असे काही…


देवास : एक कोटींच्या विम्यासाठी त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला मात्र पोलिस चौकशीत आरोपीचे बिंग उघडकीस आले व दोघांना अटक करण्यात आली. मध्य प्रदेशच्या देवास येथे हा प्रकार घडला. एक कोटींचा विमा घेण्यासाठी या व्यक्तीने चक्क कागदोपत्री मृत्यू झाल्याचं सिद्ध केले. इतकचं विमा कंपनीनेही व्यक्तीच्या कुटुंबाला एक कोटी रक्कम दिली. त्यानंतर या पैशातून तो मौजमज्जेत जीवन जगत होता. परंतु कंपनीला संशय आला आणि त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.

कंपनीला संशय आल्याने फुटले बिंग
मिळालेल्या माहितीनुसार, इटावात राहणार्‍या अब्दुल हनीफनं डइख लाइफ इन्सुरन्समध्ये 1 कोटी विमा काढला होता. याचे काही हफ्तेही तो भरत होता. परंतु त्यानंतर अब्दुलच्या डोक्यात भलताच विचार आला. त्याने मृत्यूची बनावट कागदपत्रे बनवली आणि 1 कोटी विमा मिळावा यासाठी हालचाल केली. डॉ. शाकीर मंसूरी यांच्याकडून अब्दुलनं बनावट कागदपत्रे तयार केली त्यानंतर अब्दुलच्या मुलाने नगरपालिकेकडून मृत्यू प्रमाणपत्र बनवून घेतले. प्रमाणपत्र आल्यानंतर अब्दुल हनीफच्या बायकोने डइख लाईफ इन्सुरन्स विम्यासाठी दावा केला. रक्कम अधिक होती आणि दोन हफ्ते फेडल्यानंतर मृत्यू झाल्यानं कंपनीला संशय आला. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

पोलिसांनी केली आरोपीला अटक
पोलिसांना तक्रार मिळाल्यानंतर त्यांची प्रकरणाची चौकशी केली. अब्दुल हनीफबद्दल तपास केला. तेव्हा अब्दुल बाजारात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. चौकशीवेळी अब्दुलनं डॉ. शाकीरचं नाव सांगितले त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दोघांनाही कोर्टासमोर हजर करण्यात आले. अब्दुल हनीफची पत्नी रेहाना आणि मुलगा इक्बाल पसार आहे. तपास अधिकारी पवन यादव म्हणाले की, हनीफ ड्रायव्हर होता. इतक्या मोठ्या रक्कमेचा विमा बनवण्याची त्याची कुवत नव्हती परंतु प्रथम दर्शनी रक्कम हडपण्यासाठीच त्याने विमा केल्याचं दिसून येते. त्यानंतर मृत्यूचं षडयंत्र रचून त्याने विमा कंपनीकडून रक्कम लाटली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !