साकरीसह कुर्‍ह्यात आमदार संजय सावकारेंचे सुवासिनींनी केले औक्षण


भुसावळ : भुसावळ विधानसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांनी शुक्रवारी सकाळी तालुक्यातील साकरी तसेच कुर्‍हेपानाचे गावातून शेकडो समर्थकांसह प्रचार रॅली काढली. प्रसंगी मतदारांकडून या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर सुवासिनींनी आमदारांचे औक्षण करून त्यांना आशीर्वादही दिले.

कुर्‍ह्यातील रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
कुर्‍हेपानाचे येथे भाजपा शिवसेना रीपाइं (आठवले गट) रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे, समाधान आप्पा, गोपाळ बरकले, किरण कळसकर, श्रीराम पाटील, सरपंच रामलाल बडगुजर, उपसरपंच वासुदेव वराडे, शिवसेना कार्यकर्ते जितेंद्र नागपुरे, शिवसेना कार्यकर्ते दिनेश भाऊ काकडे, दिलीप ठोंबरे, योगीराज सोनवणे, जितेंद्र कोळी, समाधान साळुंके, मंगेश पाटील, प्रशांत निकम, राजेंद्र चौधरी, किरण भैया महाजन, वंदना उन्हाळे, सुभाष पाटील, संजीव पाटील, नरेंद्र पाटील, हिमांशू दुसाने, देविदास तावरे, अनिल महाजन, दारासिंग पाटील, कळसकर व कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांकडून मतदारांना साद
भुसावळसह साकरी परीसरात शुक्रवारी निघालेल्या आमदारांच्या प्रचार रॅलीला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. साकरीतील प्रचार रॅलीत जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे, भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी, साकरी सरपंच कांचन भोळे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, वंदना उन्हाळे, सुनील महाजन, नरेंद्र पाटील, नागो भाऊ, सोपान भारंबे, संजय चौधरी, जितु चोपडे, राजेंद्र भारंबे, सोपान नेहेते, छोटू फालक, माजी सदस्य महेंद्र पांडव व इतर गावकरी मंडळी व कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !