बेस्टच्या बसने चिरडल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू


मुंबई : बेस्टच्या दोन बसमध्ये चिरडून 17 वर्षीय मुलीचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. आगारामध्ये बस नेत असताना चढावावरून बस खाली उतरल्यामुळे ही मुलगी दोन बसच्यामध्ये चिरडली गेली आणि रक्तबंबाळ झाली. प्रीती कोरी असे मयत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी एका बेस्टच्या बस चालकाला दादर पोलिसांनी अटक केली. गौतम सिद्धार्थ भालेराव असे आरोपी चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

बसखाली आल्याने मृत्यू
प्रीती कोरी ही मुलगी वरळी कोळीवाड्यातील रहिवासी असून मैत्रीणीसोबत ट्युशनला गेली होती. त्यावेळी तिची मैत्रीण मागे राहिली आणि मुलगी फोनवर बोलत पुढे आली होती. त्याचवेळी आगारामध्ये एक बेस्टची बस आत जात होती. तर दुसरी बस मागे उभी होती. अचानक पुढील बस चढणावरून मागेच्या बाजूने खाली उतरल्यामुळे दोन बसमध्ये ही मुलगी चिरडली गेली. रक्तबंबाळ अवस्थेत जखमी मुलीला तात्काळ परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 304 (अ) आणि निष्काळजीपणे बस चालवल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहेत. बसचालक गौतम सिद्धार्थ भालेराव (30) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. तो घाटकोपर येथील रहिवासी आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !