मोस्ट वॉण्टेड मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलवाद्यांचा खात्मा


मुंबई : मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेसह तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांच्या नक्षलवाद विरोधी पथकाला यश आले आहे. शनिवारी गडचिरोलीमध्ये झालेल्या चकमकीमध्ये पोलिसांनी 26 नक्षलवाद्यांना ठार केले. यामध्ये सहा महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. 26 पैकी अद्याप काही नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही, पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे देखील ठार झाला आहे. ही मोठी कारवाई असून, पोलिसांनी प्राणाची बाजी लावत ही मोहीम यशस्वी केली त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. पोलिसांनी जीवाची बाजी लावत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले ही अभिमानाची गोष्ट आहे, त्यासाठी सर्व प्रथम मी पोलिसांचे अभिनंदन करतो असे त्यांनी म्हटले आहे.

मोस्ट वॉण्टेड ठार
माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेची देशभरातील नक्षलवादी कारवायांमध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे. मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री उर्फ ज्योतिराव उर्फ श्रीनिवास या नावाने ओळख असलेल्या हा माओवादी नेता गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत ठार झाला आहे. याबाबत गृहमंत्र्यांकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मिलिंद तेलतुंबडे याचा अनेक कारवायांमध्ये सहभाग होता. तो माओवादी संघटनेच्या केंद्रीय सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य देखील होता. पोलिसांना तो अनेक प्रकरणामध्ये हवा होता. त्याची माहिती देणार्‍याला 50 लाखांचा इनाम देण्याची घोषणा करण्यात आली होती. अखेर तेलतुंबडे याला ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान मिलिंद तेलतुंबडेची पत्नी अँजेला सोनटक्के उर्फ राही उर्फ इश्कारा उर्फ सविता उर्फ कविता ही बीएस्सी (मायक्रोबायॉलॉजी), एम्एस्सी (झुऑलॉजी), एम्ए (सोशॉलॉजी) आणि बीएड अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, माडिया, गोंडी भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात. तिच्यावर पोलिसांच्या खुनासाहित अनेक आरोप असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.





ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे

1) अडमा पोडयाम – गंगलुर एरीया (छ.ग.) –

2) बंडू ऊर्फ दलसू राजु गोटा – रा. गोरगुट्टा, ता. एटापल्ली, जि. गड. – इनाम 4 लाख रुपये

3) प्रमोद ऊर्फ दलपत लालसाय कचसामी – रा. वडगाव, ता. कोरची, जि. गड – इनाम 4 लाख रुपये

4) कोसा ऊर्फ मुसाखी – बस्तर एरीया, (छ.ग.) – इनाम 4 लाख रुपये

5) निरो- दक्षिण माड एरीया, (छ.ग.)

6) चेतन पदा – दक्षिण बस्तर (छ.ग.) – इनाम 2 लाख रुपये

7) विमला ऊर्फ ईमला ऊर्फ कमला ऊर्फ मान्सो सुखराम बोगा – रा. गजामेंढी, ता. धानोरा, जि. गडचिरोली – इनाम 4 लाख रुपये

8) किशन ऊर्फ जैमन – रा दरभा एरिया (छ.ग) – इनाम 8 लाख रुपये

9) जिवा ऊर्फ दिपक ऊर्फ मिलींद तेलतुंबके – रा राजुर ता.वणी जि. यवतमाळ, इनाम 50,लाख रुपये

10) महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा, रा. रेगडीगुट्टा, गडचिरोली, डिव्हीसीएम कसनसुर दलम, एके -47, इनाम 16 लाख रुपये

11) भगतसिंग ऊर्फ प्रदिप ऊर्फ तिलक मानकुर जाडे. रा. खसोडा, गडचिरोली, एसीएम बॉडीगार्ड (मिलींद तेलतुंबडे), इनाम 6 लाख रुपये

12) सन्नू ऊर्फ कोवाची, रा. बस्तर एरीया, छत्तीसगड, कमांडर कसनसुर दलम, एके- 47, इनाम 8 लाख रुपये

13) प्रकाश ऊर्फ साधू सोनू बोगा, रा. संबलपूर, गडचिरोली, पिएम, कंपनी नं.4, एसएलआर, इनाम 4 लाख रुपये

14) लच्छु, रा. बस्तर एरिया, छत्तीसगड, पिएम कंपनी नं.4 बॉडीगार्ड प्रभाकर, 12 बोर, इनाम4 लाख रुपये

15) नवलुराम ऊर्फ दिलीप हिरुराम तुलावी, रा. गजमेंढी, गडचिरोली, पिपिसीएम कंपनी नं 4, एसएलआर व 9 एमएम पिस्टल, इनाम 4 लाख रुपये

16) लोकेश ऊर्फ मंगू पोड्याम, मडकाम, रा. जागरगुंडा, दंतेवाडा,छत्तीसगड, डिव्हीसीएम व कमांडर कंपनी नं 4, एके -47,9 एमएम पिस्टल व युबीजिएल सेल, इनाम 20 लाख रुपये


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !