यू ट्यूबच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्या : जळगावात एकाविरुध्द गुन्हा दाखल


जळगाव : वर्षभरापासून वेळोवेळी यू ट्यूबच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावुन समाजात चुकीचा समज पसरविल्याची घटना समोर आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध शुक्रवार, 12 नोव्हेंबर रोजी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तिने यूट्यूब या सोशल मीडिया साईटवर सेक्युलर डाग नावाचे युट्यूब चॅनेल सुरू केले. या चॅनलवर संबंधित अज्ञात व्यक्तिने आक्षेपार्ह व चुकीचे दिशाभूल करणारे संदेश देणारे अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ अपलोड केले. अशाप्रकारे एक ते दीड वर्षापासून अज्ञात व्यक्ती एका विशिष्ट धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावून त्या धर्माबद्दल समाजात चुकीचा गैरसमज पसरवत आहे. अशा आशयाच्या एका 68 वर्षीय वृध्दाने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !