खाकी डागाळली : सात हजारांची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात
गडचिरोली : दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर ज्याच्याविरोधात तक्रार देण्यात आली त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सात हजारांची लाच घेताना गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस नाईक सुरेश दुर्गे यास बुधवारी रात्री लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी सात हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
तडजोडीअंती स्वीकारली लाच
9 नोव्हेंबरला दोन व्यक्तींमध्ये भांडण झाले. यात ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस नाईक सुरेश दुर्गे याने 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडअंती 7 हजारावर डील करण्यात आली होती. त्याअनुषंगाने बुधवार, 17 नोव्हेंबर रोजी रात्री 7 हजार रुपयांची लाच घेताना दुर्गे याला रंगेहात पकडण्यात आले,अशी माहिती लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिली. या पोलीस स्टेशनमध्ये या अगोदर ही 17 सप्टेंबरला दोन पोलिस कर्मचारी दारु पकडल्याप्रकरणी तडजोड करण्यासाठी लाच घेतांना रंगेहात पकडल्या गेले होते. दोन महिन्यांच्या कालावधीतच ही दुसरी लाचेची घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

