पती-पत्नीची गळफास घेत आत्महत्या


उल्हासनगर : उल्हासनगरात पती पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून या दाम्पत्याची दोन मुलं मात्र या घटनेनं पोरकी झाली आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी पंढरपूरला देव दर्शन घेत आई वडिलांची भेट घेतली होती, अशी माहिती समोर आली आहे. सचिन सुतार आणि शर्वरी सुतार अशी आत्महत्या केलेली दाम्पत्याची नावे आहेत.

आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट
उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातील राजीव गांधी नगर परीसरात सचिन आणि शर्वरी सुतार हे दाम्पत्य त्यांच्या 7 आणि 4 वर्षांच्या दोन मुलांसह वास्तव्याला होतं. रविवारी सकाळी या जोडप्यानं घरातच गळफास घेतल्याचं त्यांच्या मुलांनी पाहिलं आणि शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. या घटने प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !