संतापजनक : नराधम पित्याचा मुलीवरच अत्याचार : अत्याचारातून पीडीता गर्भवती !


ठाणे : बाप-बेटीच्या नात्याला कलंक लावत नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवरच अत्याचार केल्याने तरुणी गर्भवती राहिली. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात ही घटना घडली. या धक्कादायक प्रकरणी मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.

सात महिन्यांपासून मुलीवर अत्याचार
संशयीत आरोपीला दोन मुली असून त्यात मोठ्या मुलीचे वय 13 वर्ष आहे, तर दुसर्‍या लहान मुलीचे वय 6 वर्ष आहे. आरोपी आणि त्याची पत्नी यांचं पटत नसल्याने अनेक दिवसांपासून विभक्त राहत होते. आरोपी जानेवारी महिन्यांपासून मेंगाळपाडा या ठिकाणी तर त्याची पत्नी भगतपाडा या ठिकाणी राहत होती. यामुळे मोठी मुलगी पित्याबरोबर राहत होती तर लहान मुलगी आईबरोबर राहत होती.

अत्याचारातून पीडीता गर्भवती
या दरम्यान आरोपी वडील मागील 7 महिन्यांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचं समोर आलं असून धक्कादायक म्हणजे या अत्याचारामधून पिडीत मुलगी गर्भवती देखील राहिली होती. काही दिवसांनतर आपोआपच पीडीतेच्या पोटातील गर्भाचा मृत्यू झाला असता आरोपीला हा प्रकार समजताच त्याने गर्भाची विल्हेवाट देखील लावली यामुळे हे प्रकरण दबून राहिले होते. आरोपीने पुरावे नष्ट करून देखील पीडीतेच्या आईला या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली त्यानंतर पीडीतेच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन झालेल्या प्रकारविषयी तेव्हा मुलीनं घाबरलेल्या अवस्थेत झालेल्या सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या आईला सर्व प्रकरण समजताच तिने तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याविषयी तक्रार दाखल केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !