लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : दहा हजाराची लाच स्विकारणार्या अंबड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासहरासह एका पोलीस शिपायाला ‘एसीबी’च्या पथकाने लाच स्वीकारताच पोलीस ठाण्याच्या आवारातच सापळा रचून अटक केली. पोलीस ठाणे स्तरावर जामीन प्रक्रिया पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात आरोपींनी लाच मागितली होती. उपनिरीक्षक कैलास आनंदा सोनवणे (57, रा.खांडे मळा,सिडको) व पोलीस शिपाई दीपक बाळकृष्ण वाणी (32 रा.उत्तमनगर,सिडको) अशी लाचखोर फौजदारासह पोलीस शिपायाचे नाव आहे.
लाच स्वीकारताच केली अळक
डीजीपीनगर भागात राहणार्या याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. महिलेवर अंबड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुह्यात अटक टाळण्यासाठी महिलेने न्यायालयात धाव घेतल्याने तिला कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पोलीस स्टेशन स्तरावर जामीन प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी महिलेने संशयीतांची भेट घेतली असता त्यांनी 15 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडी अंती दहा हजार रूपये देण्याचे ठरले होते. याबाबत महिलेने एसीबीशी संपर्क साधला असता ही कारवाई करण्यात आली. संशयीतांपैकी पोलीस शिपाई असलेल्या वाणी याने पंचासमोर दहा हजाराची लाच स्विकारली असता त्यास रंगेहात पकडण्यात आले. दोघांनाही एसीबी पथकाने अटक केल्यानंतर लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

