शिवसेना नेते अर्जुन खोतकरांकडे ईडीचा छापा


औरंगाबाद : माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी शुक्रवारी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने छापेमारी केल्याने राज्यात खळबळ उडाली. 12 जणांच्या पथकाकडून सकाळी साडेवाठ वाजल्यापासून खोतकर यांच्या घरी ईडीकडून तपासणी करण्यात आली. औरंगाबादमधील एका उद्योजक आणि व्यावसायीकाच्या घरी ईडीने केलेल्या छापेमारीचं कनेक्शन खोतकरांशी असल्याची माहिती समोर आली आहे.

किरीट सोमय्यांनी केला होता आरोप
‘शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील रामनगर सहकारी साखर कारखाना बेनामी पद्धतीने, फसवणूक करून खरेदी करीत शंभर कोटींचा घोटाळा केला आहे,’ असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. साखर कारखान्याची कोट्यावधी रुपयांची जमीनही बळकविण्याचा खोतकर यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. सोमय्या म्हणाले, ‘या संपूर्ण प्रकरणाचे कागदोपत्री पुरावे सक्तवसुली संचालनालय (ईडी), प्राप्तिकर विभाग, राज्य व केंद्राच्या सहकार विभागाकडे दिले असून या घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे. जालना सहकारी साखर कारखाना 1986-87 मध्ये सुरू झाला. त्यासाठी शेतकर्‍यांनी सुमारे 135 एकर जमीन नाममात्र दराने कारखान्यास दिली. प्रत्येक शेतकर्‍याला दोन हजार रुपयांचा एक शेअर देण्यात आला होता. असे एकूण नऊ हजार भागधारक होते. पुढे एमएससी बँकेची थकबाकी 2007 अखेर 11.42 कोटी एवढी झाल्याने हा कारखाना लिलावात काढण्यास भाग पाडण्यात आले.’ जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात खोतकरांचा संबंध असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता.



आरोपानंतर अखेर ईडीचा छापा
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर शुक्रवारी ईडीने खोतकर यांच्या घरी छापा मारत तपासणी केली. गुरुवारीच शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीने कारवाई केल्यानंतर शुक्रवारी खोतकर यांच्यावर छापा टाकण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !