भरधाव वाहनाची धडक : एकाच कुटुंबातील मुला-मुलीसह महिला ठार
तीन सदस्य गंभीर जखमी : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
पुणे : रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने उडवल्याने एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले तर अन्य तीन सदस्य जखमी झाले. हा भीषण अपघात पुणे-सोलापूर महामार्गावरील करकुंभ येथे एमआयडीसी चौकात घडल. मृतांमध्ये अल्पवयीन मुला-मुलीसह महिलेचा समावेश आहे तर अन्य तीन सदस्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांची तसेच जखमींची नावे समजू शकली नाहीत.
भरधाव वाहनाच्या धडकेने तिघे ठार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका भरधाव वाहनाने पाच जणांना चिरडून जवळपास पन्नास फुटांवर फेकले. त्यामुळे तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला व इतर गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णवाहिका जखमींना घेऊन गेल्यावर मृत्युमुखी पडलेले इतर तीन जण तब्बल तासभर रस्त्यावरच पडून होते. त्यातच कामावरून सुटण्याची वेळ असल्याने शेकडोच्या संख्येने नागरीक व कामगारांनी गर्दी झाली. महामार्गाच्या रुग्णवाहिका वेळेत न पोहचल्याने औद्योगिक क्षेत्रातील सिप्ला व अल्कली अमाईन्स या कंपनीच्या रुग्णवाहिकेत शव दौंड येथे हलवण्यात आले.

