भीषण अपघात : पाच जण जागीच ठार : या तालुक्यात घडली घटना
टेंभुर्णी : मळीचा टँकर आणि तांदळाच्या ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन पाचजण जागीच ठार झाले तर सहाजण गंभीर जखमी झाले. माढा तालुक्यात भीमानगर पुलाजवळ शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
पाच जण जागीच ठार
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मळीचा टँकर (एम. एच. 14 / सी.पी. 4020) हा इंदापूरहून सोलापूरकडे निघालेला होता. सोलापूर हद्दीतील माढा तालुक्यात भीमा नगर येथे एका पुलाजवळ सरदारजी ढाब्यासमोर हा टँकर आला असता समोरुन येणारा तांदळाचा ट्रक (एम.एच.25 / यू4045) रस्ता दुभाजकाला धकडून समोरून येणार्या या टँकरवर जोरदार आदळला. हा अपघात इतका भीषण होता की मळीच्या टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रक पलटी होऊन चालकाच्या केबीनमधे बसलेले पाचजण जागीच ठार झाले. ट्रकमधील लहान मुलं आणि स्त्रीयांसह तीनजण जखमी झाले असून त्यांना इंदापूर जवळील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातातील ट्रक हा सोलापूरमधून तांदळाची गोणी घेऊन मुंबईकडे निघालेला होता. या अपघातात दोन लहान मुले, महिला जखमी झाले आहेत. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असून इंदापूर जवळील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

