कापूस व्यापारी स्वप्नील शिंपींचा मित्रानेच केला खून !

अखिल भारतीय श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाजासह नातेवाईकांचा पत्रकार परीषदेत आरोप


जळगाव : फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी (29, रा. फरकांडे, ता.एरंडोल) या तरुणाचा शुक्रवार, 26 नोव्हेंबर रोजी पैश्यांसाठी हल्ला झाला नसून कट कारस्थानातून मित्र दिलीप चौधरी यानेच खून केला असून त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाज व मयत स्वप्निलचे नातेवाईकांनी केली आहे. बळीराम पेठेतील पत्रकार भवनात रविवार, 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पत्रकार परीषदेत नातेवाईकांनी आरोप केला.

कट रचून कापूस व्यापार्‍याची हत्या
अखिल भारतीय श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र बाबा बागुल यांनी सांगितले की, दिलीप राजेंद्र चौधरी (रा.फरकांडे, ता.एरंडोलए जि.जळगाव) याने स्वप्नीलची कट रचून हत्या केली आहे. हल्ला झाल्यानंतर मयतच्या अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने या घटनेचा कसून चौकशी करावा आणि कोणतीही राजकीय व सामाजिक याचा दबाव न आणता मारेकर्‍यांवर भादंवि कलम 302 लावावा, अशी मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करून मारेकर्‍यांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी अखिल भारतीय श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.



प्रशासनाकडे चौकशीची मागणी करणार
बागुल पुढे म्हणाले की, मयत स्वप्निलच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली. यावेळी कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली असता हा पैश्यांसाठी हल्ला नसून सोबत असलेला दिलीप राजेंद्र चौधरी याने कट रचून हा खून करण्यात आला. मयताच्या पश्चात तीन वर्षाची मुलगी, पत्नी गर्भवती, आई वडील असा परीवार असल्याचे बागुल यांनी सांगितले. दरम्यान, या हल्ल्यात दिलीप चौधरी याला कुठलीही दुखापत झालेली नसून त्याच्या प्रतिक्रियावरून मयत स्वप्निल विषयी कोणतीही सहानुभूती दिसून आली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील, पोलीस प्रशासनाकडे करणार असल्याचेही बागुल सांगितले.

यांची होती उपस्थिती
अखिल भारतीय श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रबाबा, मयत स्वप्नीलचे वडील रत्नाकर खैरनार, संजय खैरनार, मनोज भंडारकर, राजेंद्र सोनवणे, शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कापूरे, संजय जगताप, शिवाजी शिंपी, जयंत कन्नडकर, रत्नाकर शिंपी, सुरेश सोनवणे, अनिल खैरनार, युवाध्यक्ष प्रमोद शिंपी, राजेश खैरनार, दिलीप भांडारकर, सुरेश कापुरे, बंडूनाना शिंपी, संजय इसई, अनिल मांडगे, मनोज जगदाळे आदी शिंपी समाजबांधव उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !