भांडण बेतले मित्राच्या जीवावर : खुनानंतर आरोपी पोलिसात हजर


पुणे : फुटपाथवर कचरा वेचताना दोन मित्रांमध्ये झालेले भांडण एकाच्या जीवावर बेतले. या घटनेत अमन अशोक यादव (26) या तरुणाचा मृत्यू झाला. आरसीएम गुजराथी शाळेसमोरील फुटपाथवर बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. चेतन पाटील असे आरोपीचे नाव असून फरासखाना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीनंतर खुनानंतर स्वतः पोलिसात हजर झाला.

भांडण बेतले जीवावर
आरोपी चेतन पाटील व त्याचा मित्र अमन यादव हे कचरा वेचण्याचे काम करतात. दोन -तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती. त्याचा राग पाटील याच्या मनात होता. बुधवारी सकाळी ते कचरा गोळा करण्यासाठी पुन्हा आरसीएम गुजराथी शाळेसमोर आले होते. येथील फुटपाथवर त्यांच्यावर पुन्हा वाद झाला. त्यावेळी पाटील याने अमन यादव याच्यावर चाकूने वार करुन त्याचा खून केला. त्यानंतर तो स्वत:च रक्ताळलेला चाकू घेऊन पोलीस चौकीत पोहोचला. चाकूसह आलेल्या आरोपीला पाहून पोलिसांची धांदल उडाली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे एक मृतदेह पडलेला आढळून आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !