धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडेंची पदोन्नतीवर ठाणे शहर सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बदली


धुळे : धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील बाबासाहेब कुराडे यांची ठाणे शहर सहाय्यक पोलिस आयुक्तपदी पदोन्नतीवर गुरुवारी बदली झाली आहे. राज्यातील 175 पोलिस निरीक्षक संवर्गातील अधिकार्‍यांच्या पोलिस उपअधीक्षक/सहाय्यक पोलिस आयुक्त या पदावर तात्पुरता पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील आदेश गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी गुरुवार, 2 रोजी काढले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकार्‍यांना या आदेशाने मोठा दिलासा मिळाला आहे.

धुळ्यातील कुराडेंची ठाण्यात बदली
गेल्या दोन वर्षांपासून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी धुरा सांभाळणार्‍या पोलिस उपअधीक्षक सुनील बाबासाहेब कुराडे यांची ठाणे शहर सहाय्यक पोलिस आयुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे.

खान्देशातून यांचीही बढतीवर बदली
धुळ्यातील अनंत रघुनाथ तारगे यांची नागपूर लोहमार्ग विभागातील अकोला उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली झाली तर नंदुरबारचे अविनाश दादासाहेब मोरे यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलिस अधीक्षकपदी बढतीवर बदली झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सेवा बजावलेले मात्र हल्ली नाशिक ग्रामीणला असलेले राजेशसिंह अर्जुनसिंह चंदेल यांची बृहन्मुंबई सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढतीवर बदली झाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !