लग्नापूर्वीच्या संबंधाचा व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेलिंग : आरोपी प्रियकराला अटक


नागपूर : लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंध लग्नाच्या काही वर्षानंतर पुन्हा बहरले मात्र प्रियकराकडून होणार्‍या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर विवाहितेने तक्रार दिल्यावरून प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने आरोपीस अटक करण्यात आली. मनीष सजन तांबेकर (38) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. तो उमरेडमध्ये पान टपरी चालवतो.

लग्नानंतर पुन्हा बहरले प्रेम
35 वर्षीय विवाहितेचे लग्नापूर्वी मनीषसोबत प्रेमसंबंध होते मात्र दोघांच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केल्यानंतर दोघांचे वेगेवगळ्या ठिकाणी लग्न झाले मात्र दीड वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या कालावधीत ते पुन्हा संपर्कात आल्यानंतर प्रेम बहरले. या प्रकारानंतर मात्र प्रियकर मे 2020 पासून तो तिच्यावर नको तेवढा अधिकार दाखवू लागला. वारंवार भेटीगाठी होऊ लागल्याने महिलेच्या पतीला त्यांच्या प्रेमकथेची माहिती झाली. त्याने तिची खरडपट्टी काढल्याने तिने मनीषला टाळणे सुरू केले. परीणामी मनीष तिला त्यांच्या संबंधाचे व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करू लागला. तिचा वेळोवेळी पाठलाग करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करू लागला. तिची कोंडी झाल्याने तिने नवर्‍याला हा प्रकार सांगितला. त्यानंतर प्रकरण जरीपटका ठाण्यात पोहोचले. वरिष्ठ निरीक्षक वैभव जाधव आणि द्वितीय निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना महिलेने आपली व्यथा वजा तक्रार सांगितली. प्रकरणाची संवेदनशिलता लक्षात घेत पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !