अल्पवयीन मुलीची प्रसूती ; बार्शीत पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा


बार्शी : अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात मुलीचे आई, वडील, सासू,पतीसह इतरांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे. मुंबईच्या महिला पोलिस कर्मचारीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणात गुन्ह्याची सुरुवात बार्शीतून झाल्यामुळे गुन्हा बार्शी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. एक 17 वर्षे वयाची तरुणी ही गरोदर असल्याने उपचारासाठी तिला तिच्या आईने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मुंबईच्या केईएम हॉस्पिटलने 29 सप्टेंबर रोजी भोईवाडा पोलिस ठाण्यास दिली. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत तरुणीची प्रसूती झाल्याचे समजले. पीडितेच्या आईकडे चौकशी केली असता तरुणीच्या वयाबाबत वेगवेगळ्या कागदोपत्री नोंदी असल्याचे दिसून आले. त्या अल्पवयीन मुलीच्या चौकशीत तिने सांगितले की, लग्नानंतर पतीसोबत सासरी राहत आहे. तिचा जन्म 24 मार्च 2004 रोजी झाला असून लग्न बार्शी येथे 31 ऑगस्ट 2020 रोजी पार पडले. यानंतर 28 सप्टेंबर 2021 रोजी ती प्रसूतीकरिता केईएम रुग्णालय, परेल, मुंबई येथे दाखल झाली होती. चौकशीत तरुणीने मुलीला जन्म दिला तेव्हा तिचे वय हे 17 वर्षे 6 महिने 7 दिवस असल्याचे आढळले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !