झाडाला गळफास घेत प्रेमी युगुलाची आत्महत्या
भंडारा : साकोली तालुक्यातील सुंदरी येथील शेतशिवारात एका प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गाव परीसरात एकच खळबळ उडाली. कोमल वाघ (परसोडी) व कमलेश राऊत (सुंदरी) असे मृत प्रेमी युगुलाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
प्रेम प्रकरणातून पाऊल उचलल्याची शक्यता
शनिवारी सकाळी सुंदरी येथील शेतशिवारात एकाच झाडाला युवक व युवती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. याची माहिती गावात वार्यासारखी पसरताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. साकोली पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या चौकशीनंतर दोघे नम्रता ज्युनिअर कॉलेज साकोली येथील बारावीचे विद्यार्थी असल्याचे पुढे आले. मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट असून प्रेम प्रकरणातून त्यांनी हे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे.

