अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस ईडीच्या ताब्यात
मुंबई : मुंबई विमानतळावर बॉलिवुडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला ईडीच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर खळबळ उडाली. ईडीने 200 कोटींच्या मनी लाँड्रींगप्रकरणी लूक आऊट सर्क्युलर काढल्याने जॅकलीनला पुन्हा घरी परतावे लागले आहे. जॅकलीन शोसाठी मस्कतला जात होती. मात्र विमानतळावर जाताच तिला ताब्यात घेण्यात आले, आणि काही वेळाने कारवाई पूर्ण करून तिला घरी माघारी पाठविण्यात आले. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार ईडीने जॅकलीन फर्नांडिसविरोधात 200 कोटी रुपयांच्या अफरातफरीप्रकरणी लुक आऊट सर्क्युलर जारी केले आहे. यामुळे विमानतळावरील इमिग्रेशन डिपार्टमेंटने तिला रोखले.
यापूर्वी दोन वेळा चौकशी
जॅकलीन ही काही दिवसांपूर्वीच दीववरून ‘राम सेतु’ या सिनेमाचे शुटिंग आटोपून मुंबईत परतली होती. 10 डिसेंबरला रियादमध्ये सलमान खानच्या दबंग टुरमध्ये ती सहभागी होणार होती. सुकेश चंद्रशेखर प्रकरणी ईडीच्या अधिकार्यांनी जॅकलीनची दोनदा चौकशी केली होती. तेव्हा तिने आपल्याला या फसवणुकीत गुंतविण्यात आल्याचे म्हटले होते.




जॅकलीनला महागड्या वस्तू दिल्या
सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या आणि त्यामुळेच ईडीने अभिनेत्रीला चौकशीसाठी बोलावले होते मात्र जेव्हा-जेव्हा जॅकलिनला सुकेशबद्दल प्रश्न विचारण्यात आला, प्रत्येक वेळी जॅकलिने ती सुकेशला ओळखत नाही असेच उत्तर दिले. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. ईडीने 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कथित गुन्हेगार सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी अभिनेत्री लीना मारिया पॉल आणि इतर सहा जणांविरुद्ध 7,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रानुसार, रिपोर्ट्सच्या हवाल्याने, चंद्रशेखरने चौकशीदरम्यान खुलासा केला की त्याने 50 लाख किमतीचा घोडा आणि 9 लाख किमतीची एक पर्शियन मांजर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला भेट दिली होती. आता मात्र जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची लक्षणं आहेत.
सुकेशवर फसवणुकीचा आरोप
रॅनबॅक्सीच्या प्रमोटरला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सुकेशवर पत्नीची 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीचीही एजन्सीने चौकशी केली होती.
Actor Jacqueline Fernandez was stopped at the Mumbai Airport by immigration officials due to a LOC (Look Out Circular) in connection with a Rs 200 crore extortion case involving conman Sukesh. She was supposed to fly to Muscat: Sources
— ANI (@ANI) December 5, 2021