प्रेमविवाह केल्यानंतर संतप्त भावाने बहिणीचे मुंडकेच उडवले !


औरंगाबाद : प्रेम विवाह केल्यामुळे अल्पवयीन भावाकडून मोठ्या बहिणीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून मुंडकेच धडावेगळे करण्यात आले. या दरम्यान तरुणीच्या पतीने पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली. किशोरी मोटे(19) असे हत्या झालेल्या विवाहीतेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि आईला ताब्यात घेतले आहे.

संतापात केला वार
आरोपी मुळचा गोयेगाव येथील रहिवाशी आहे. सहा महिन्यांपूर्वी बहिणीने आळंदीत प्रेमविवाह केल्यानंतर बहिणीला भेटण्यासाठी तो आपल्या आईसोबत रविवारी लाडगावला गेला होता. यावेळी त्याने रागाच्या भरात आपल्या सख्ख्या बहिणीवर कोयत्याने वार केला. वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात ही घटना घडली. बहिणीला पाहून भावाला राग अनावर झाला आणि त्याने कोयत्याने बहिणीच्या गळ्यावर सपासप वार केले. हा सर्व प्रकार पाहून किशोरीच्या पतीने पळ काढला आणि आपला जीव वाचवला. शेजारील काही लोकांना या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि आईला ताब्यात घेतले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !