सुळेसह रीगावात खासदारांच्या उपस्थितीत भाजपा शाखांचे उद्घाटन
मुक्ताईनगर : तालुक्यातील मौजे सुळे व रीगाव येथे खासदार रक्षा खडसे, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके व भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
खासदारांनी दिली कल्याणकारी योजनांची माहिती
यावेळी डॉ.राजेंद्र फडके व भाजपा प्रदेश उपाध्यक्षअशोक कांडेलकर यांनी उपस्थित भाजपा कार्यकर्ते व नागरीकांना पक्षाचा इतिहास व ध्येय धोरणा विषयी माहिती दिली तसेच खासदार रक्षा खडसे यांनी मोदी सरकारने गोर-गरीब जनतेसाठी आणलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा सरचिटणीस संतोष खोरखेडे, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, विनोद पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सवळे, भाजपा अ.जा.मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष झनके, कुर्हा शहराध्यक्ष रवी राजपूत, भागवत शेठ राठोड, समाधान इंगळे, साहेबराव पाटील, तालुका सरचिटणीस विशाल झालटे यांच्यासह नवनिर्वाचित भाजपा शाखा पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.


