वरणगावातील नाना चौधरींचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश


वरणगाव : शहरातील समाजसेवक, युवा कार्यकर्ते नाना चौधरी यांनी त्यांचे प्रमुख समर्थक राजेश चौधरी, पिंपळगाव खुर्दचे ऋषी कोलते यांच्यासह भारतीय जनता पार्टीत माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वातवर विश्वास ठेवून प्रवेश केला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपाचे शहर उपाध्यक्ष नटराज चौधरी, शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, भाजयुमोचे सरचिटणीस आकाश निमकर, उपाध्यक्ष पप्पू ठाकरे आदींची उपस्थिती होती.

भाजपाशिवाय पर्याय नाही : नाना चौधरी
भाजपात प्रवेश केल्यानंतर नाना चौधरी यांनी सांगितले की, वरणगाव शहरात कधी नव्हे इतकी विकासाची कामे भाजपाचे सरकार असतांना झाली आहेत. आज वरणगाव शहरासाठी भाजपाने 24 तास पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कमी वेळेत जास्त विकास फक्त भाजपाच करू शकते व भविष्यात सुद्धा वरणगाव शहराला राज्यात क्रमांक एक वर न्यायचे असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही, असे प्रवेश करते वेळी नाना चौधरी म्हणाले. लवकरच वरणगाव शहरात भव्य प्रवेश सोहळा आयोजित करणार असल्याचे नाना चौधरी यावेळी म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !