दादर स्टेशन नामांतरासाठी जाणार्या जगन सोनवणेंसह आंदोलकांना भुसावळात रोखले
अटकेच्या कारवाईनंतर आंदोलकांची सुटका ः संविधान आर्मीने दिला होता इशारा
भुसावळ : दादर स्टेशनचे नामकरण करावे, या मागणीसाठी मुंबईला जाणार्या संविधान आर्मीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी रविवारी सायंकाळी कारवाई केली. गांधी पुतळ्याजवळ पोलिसांनी अडवल्यामुळे आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. यानंतर आंदोलकांना अटक व सुटका करण्यात आली. दादर स्टेशनचे नामकरण करावे, या मागणीसाठी संविधान आर्मी व दहा संघटनांनी 6 डिसेंबरला मुंबई येथे आंदोलनाचा इशारा दिला होता. यानुसार रविवारी सायंकाळी संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे, नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे व भिमसैनिक मुंबईकडे निघाले होते. गांधी पुतळ्याजवळ पोलिसांनी त्यांना अडवून अटक केली. यावेळी जगन सोनवणे यांनी पोलिसांवर दडपशाही व मुस्कटदाबीचा आरोप केला.
यांचा आंदोलनात सहभाग
दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास कुणाची व काय हरकत आहे? अशी विचारणा केली. तसेच अटकेच्या कारवाईचा निषेध व जोरदार घोषणाबाजी केली. नंतर आंदोलकांची सुटका झाली. संविधान आर्मीचे प्रदेशाध्यक्ष राकेश बग्गन, हरिष सुरवाडे, आरिफ शेख, संगीता मोरे, धनराज गोळे, इरफान शेख, विशाल पवार, जयराज पुरभी, रमजान तडवी, चेतन सुरवाडे, रोहित तायडे, अजय तायडे, मिलिंद भालेराव, विजय धुनदाळे, प्यारेलाल यादव, मुकेश वाकोडे, जावेद खाटीक, गोपी साळी, चंदू पहिलवान आदी कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होते.


पोलिसांवर दडपशाहीचा केला आरोप
जगन सोनवणे यांनी पोलिसांवर दडपशाही व मुस्कटदाबीचा आरोप केला. दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास कुणाची व काय हरकत आहे? अशी विचारणा केली. तसेच अटकेच्या कारवाईचा निषेध व जोरदार घोषणाबाजी केली.
