भुसावळात जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी नूतन अध्यक्ष बाळासाहेब पवारांचा सत्कार
भुसावळ : जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांचा भुसावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील यशोधरा नगरातील कार्यकर्ता मेळाव्यात मंगळवारी सत्कार करण्यात आला. प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, जिल्हा परीषदेचे गटनेता प्रभाकर सोनवणे, जिल्हा काँग्रेसचे प्रशासकीय सरचिटणीस जमील शेख यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यांची मेळाव्याला उपस्थिती
मेळाव्यास बाळासाहेब प्रदीप पवार, जिल्हा परीषदेचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे, जिल्हा काँग्रेसचे प्रशासकीय सरचिटणीस जमील शेख, प्रदेश काँग्रेस अनु.जाती विभागाचे प्रदेश सचिव राहुल मोरे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, भुसावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पंकज पाटील, जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र श्रीनाथ, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुनव्वर खान, अल्पसंख्यांक विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष के.बी.काझी, वरणगावचे शहराध्यक्ष अशपाक काझी, युवक काँग्रेसचे इमरान खान, यावलचे शहराध्यक्ष कदीर भाई, उपाध्यक्ष नितीन पटाव, ईस्माईल गवळी, रहिम कुरेशी, गफूर गवळी, अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जवरे, उपाध्यक्ष विनोद पवार, सागर कुरेशी, सुरेश टाक, कुणाल सुरळकर, मुकेश सपकाळे, राजु सपकाळे, काशीनाथ जाधव, प्रताप इंगळे, शैलेश बोदवडे, रवी पाटील, राजू पालिमकर, प्रा.मनोज देशमुख, प्रकाश मोरे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कल्पना तायडे, कांचन नरवाडे, सारीका शिरसाठ, वॉर्डातील असंख्य नागरिक व महिला उपस्थित होते. प्रास्ताविक विवेक नरवाडे तर सूत्रसंचालन संभाजी सोनवणे तसेच आभार सुनील जवरे यांनी मानले.


