शंभर कोटींचे वसुली प्रकरण : सीबीआयने नोंदवला सात पोलिसांचा जवाब


मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा आरोप केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता सीबीआयने अनिल देशमुख (anil deshmukh) गृहमंत्री असताना शासकीय बंगला ‘ज्ञानेश्वरी’ वर सुरक्षेसाठी असलेल्या सात पोलिसांची चौकशी केली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे.

सीबीआयकडून आरोपांची चौकशी
अ‍ॅड.जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने सीबीआयला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर सीबीआयने प्राथमिक तपासानंतर अनिल देशमुख यांच्यासह इतरांविरोधात 24 एप्रिल 2021 रोजी गुन्हा नोंदवला होता. दरम्यान, अनिल देशमुखांच्या (anil deshmukh) पत्नी आरती देशमुख यांना हायकोर्टानं अंतरीम दिलासा दिला आहे. पीएमएलए लवादाचे मालमत्तेच्या जप्तीसंदर्भात अंतिम आदेश दिले तरी आमचे आदेश येईपर्यंत यासंदर्भात कोणतीही कठोर कारवाई करू नका, असे स्पष्ट निर्देश शुक्रवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठानं ईडीला  (ED) दिले आहेत. यावर आता 10 जानेवारी रोजी हायकोर्टात पुढील सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या याचिकेत ईडीनंही  (ED) हायकोर्टात मध्यस्थ याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आम्हाला ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय देऊ नका, अशी मागणी करत ईडीनं  (ED) आरती देशमुखांना हायकोर्टानं तूर्तास दिलेल्या दिलाशाविरोधात याचिका दाखल केली आहे.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !