अल्पवयीन मुलीवर निर्जनस्थळी अत्याचार : अहमदनगर जिल्हा हादरला


अहमदनगर : अल्पवयीन मुलीला ओळखत दाखवत तिच्यावर निर्जन स्थळी अत्याचार करण्यात आल्याची घटना एमआयडीसीम परीसरात घडल्याने जिल्ह्यासह रात्यात मोठी खळबळ उडाली. दहा वर्षांची मुलगी साईबनजवळच्या ओसाड माळरानावर शेळ्या चारत होती. त्यावेळी अज्ञात व्यक्ती हा तेथे आला. त्याने मुलीसोबत ओळख असल्याचे दर्शवून तिला याच परीरसरात असलेल्या ओढ्याकडे घेऊन गेला. तेथे त्याने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडित मुलीने आरोपी तेथून निघून गेल्यानंतर घरी जाऊन आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे तिच्या आईने तिला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले.

अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा
पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास एमआयडीसीमधील साईबनजवळच्या ओढ्यात घडला. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरूद्ध बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 च्या कलम चार, पाच व एम सहानुसार गुन्हा दाखल केला आहे. नगर ग्रामीण उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे तपास करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !