भीषण अपघात : तिघे कामगार जागीच ठार


रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर बोरघाट उतरताना प्रवासी बसने उडवल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला तर अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे महामार्गाच्या मध्यभागी काँक्रिटीकरण सुरु असताना प्रवासी बसने सिमेंट बल्कर आणि त्या ठिकाणी काम करणार्‍या काही कामगारांना धडक दिली तर आणखी एका वाहनाने बसला धडक दिल्याचे सांगण्यात आले.

दोघांचा जागीच मृत्यू
या अपघातात मृत्युमुखी पडलेले तीनही जण महामार्गावर काम करणारे कामगार आहेत. दोघा कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारासाठी नेले जात असताना वाटेत मृत्यूने गाठले. तसेच आणखी दोन कामगार गंभीर जखमी असून त्यांना कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत, मात्र काही जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या प्रवाशांना इतर दोन बसने मुंबईला पाठवण्यात आले आहे.

मदतकार्यासाठी अनेकांची धाव
आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्यची अ‍ॅम्ब्युलन्स व्यवस्था, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, प्सकॉन कंपनीचे कर्मचारी, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य तसेच मृत्युंजय देवदूत यांनी अपघात घडलेल्या ठिकाणी मदत केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !