सावद्यात नगरसेवकांचा ठिय्या आंदोलन व उपोषणाचा इशारा

विकासकामे होत नसल्याचा आरोप : 16 रोजी उपोषण आंदोलनाचा इशारा


सावदा : सावदा नगरपालिकेत वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी निधी येऊनदेखील पालिकेचा नाहरकत दाखला मिळत नाही, शासनाने ठरवून दिलेल्या नावाऐवजी दुसर्‍या नावाने नाहरकत दाखला देणे तसेच विशेष सभा होत नसल्याने येथील तीन नगरसेवकांनी तीन दिवसात विशेष सभा घेऊन निर्णय न झाल्यास नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचे दालना समोर ठिय्या आंदोलन तर 16 डिसेंबर रोजी उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाव्दारे दिला आहे.

विशेष अनुदान प्राप्त
कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग मंत्रालय, मुंबई यांचे पत्र जा.क्र न. नपम 2019 प.क्र 52/ नवि 16 दिनांक 29 सप्टेंबर 2021 यांचे संदर्भानुसास शासन निर्णयानुसार नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान प्राप्त झाले आहे तसेच सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पत्र 3362 सावदा सन 2021 नुसार सावदा नगरपरीषद हद्दीतील शादीखानाचे काम सुचित केले परंतु ठरावात शादीखाना ऐवजी शासनाने ठरवून दिलेले नाव देऊन ठराव करण्यासाठी पत्र 6 ऑक्टोबर 2021 तारखेला दिलेले असताना नगरपालिका अध्यक्षा तसेच प्रशासन जाणून बुजून हे ठराव करून देत नाही. जाणून बुजून मुस्लीम समाजासाठी होणार्‍या शादीखान्याला दुर्लक्ष किंवा टाळाटाळ होत असून नवीन हद्दवाढ क्षेत्रामध्ये नवीन एलईडी लाईट व स्ट्रीट लाईट कंडक्टर लावणे तसेच बुधवारा भागात नवीन होत असलेल्या दुकान संकुलाच्या वरील भागात एक रुम (जानोसा) मिळण्याच्यामागणीसाठी तीन दिवसात विशेष सभा घ्यावी अन्यथा मुख्याधिकारी दालनासमोर कार्यालयीन वेळ संपेपर्यंत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे शिवाय गुरुवार, 16 डिसेंबरपासून उपोषण छेतील, असा इशारा फिरोजखान हबीबुल्लाखान, नाजेरा इश्तेयाक बागवान व अल्लाबक्ष शेख नजीर यांनी दिला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !