भुसावळातील जय गणेश फाऊंडेशनतर्फे उद्या राष्ट्रवादी कबड्डी चषकाचे आयोजन

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते उद्घाटन : गुरूवारी जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्यांच्या उपस्थितीत समारोप


भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शहरात जय गणेश फाऊंडेशन स्पोर्ट्स क्लबतर्फे जिल्हास्तरीय राष्ट्रवादी कबड्डी चषकाचे आयोजन 15 व 16 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आले आहे.

यांची राहणार उपस्थिती
भुसावळ शहरातील नवसाचा गणपती पटांगण, संतोषी माता हॉलजवळ, सुरभी नगर येथे जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा निवड चाचणी पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन बुधवार, 15 रोजी दुपारी चार वाजता करण्यात आले आहे. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी असतील. ध्वजारोहण नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याहस्ते, क्रीडांगण पूजन उद्योजक राधेश्याम लाहोटी यांच्याहस्ते होणार आहे. नाणेफेक उद्योजक राजेश राका व जिल्हा कबड्डी असो.चे सरकार्यवाह नितीन बरडे यांच्याहस्ते होईल.



16 रोजी स्पर्धेचा समारोप
दोन दिवसीय दिवस-रात्री होणार्‍या स्पर्धेचा समारोप व पारीतोषिक वितरण समारोह गुरुवार, 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्याहस्ते होणार आहे. अंतिम सामन्याचे नाणेफेक माजी पालकमंत्री सतीष अण्णा पाटील यांच्याहस्ते होईल. प्रमुख अतिथी म्हणून अमळनेरचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार मनीष जैन, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, जिल्हा कबड्डी असो.चे कार्याध्यक्ष श्याम कोगटा असतील. दोन्ही दिवस जिल्ह्यातील निमंत्रित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परीसरातील विविध मंडळांचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे. सर्व क्रीडा प्रेमींनी स्पर्धांचा लाभ घ्यावा व उपस्थिती द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष, जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक उमेश नेमाडे, जय गणेश फाऊंडेशनचे अध्यक्ष धीरज धांडे, सचिव तुषार झांबरे, स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष निलेश कोलते, कार्याध्यक्ष चैत्रामअप्पा पवार यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !