चुलत दिराकडून वहिनीवर बलात्कार


सातारा :  चुलत दिरानेच वहिनीवर बलात्कार केला तर विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दिराने हे कृत्य वारंवार केले असल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सातारा तालुक्यातील एका गावात ही संतापजनक घटना घडली.

आमिष दाखवत केला अत्याचार
पीडित विवाहिता 23 वर्षांची असून, ती मुले आणि पती समवेत राहते. तिचा चुलत दीर 3 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता घरात कोणी नसताना गेला. बँकेत नोकरी लावतो, असे आमिष दाखवून वहिनीशी त्याने जवळीक साधली. त्यानंतर त्याने वहिनीवर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितलास तर मी तुझ्या मुलांना व नवर्‍याला मारून टाकीन, तसेच तुझे विवस्त्र फोटो मोबाईलद्वारे व्हायरल करीन, अशी त्याने धमकी देऊन वारंवार वहिनीवर बलात्कार केला.

आरोपीला अटक
दिराचा अधिकच त्रास जाणवू लागल्यानंतर तिने घडलेला प्रकार घरातल्यांना सांगितला. त्यानंतर घरातल्यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन दिराचा घृणास्पद प्रकार कथन केला. पोलिसांनी दिराला ताब्यात घेतले असून, सहायक पोलिस निरीक्षक डॉ.सागर वाघ हे अधिक तपास करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !