किराणा दुकान, बेकरीतही मिळणार वाईन : राज्य सरकारची तयारी
मुंबई : किराणा दुकान, बेकरी किंवा डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये आता वाईन मिळणार असून तशी तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. अशा ठिकाणी विकल्या जाणार्या वाईनवर एक लिटरमागे 10 रुपये अबकारी कर लावण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे त्यामुळे सरकारच्या तिजोरीत भर पडेल. राज्यात दरवर्षी अंदाजे 70 लाख वाईन बॉटल्सची विक्री होते. सरकारने या विक्रीला किराणा दुकाने व इतर ठिकाणी परवानगी दिली तर ही विक्री एक कोटींवर जाण्याची शक्यता आहे. अर्थात अबकारी कर लावल्यामुळे वाईनच्या किमती थोड्या वाढणार असल्याची शक्यता आहे.
