दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई : दहावीसह बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल रोजी होईल दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल रोजी होणार आहे. या संदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून घोषणा केली आहे.
शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी अर्थात 2022 साली 12वीची लेखी परीक्षा 4 मार्च रोजी होणार असून 10वीची लेखी परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाचं आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचं नियोजन करणं शक्य होणार आहे. ओमायक्रॉनबाबत आपण मॉनिटरिंग करत आहोत. पण 10वी आणि 12वी ही विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने महत्त्वाची वर्ष असतात. या परीक्षा कधी होणार अशी विचारणा होत होती. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 12वीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत होईल. तर 10वीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

