भुसावळात भाजपाला खिंडार : 16 विद्यमान नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

आगामी काळात बदलणार राजकीय समीकरणे : नाथाभाऊंची वाढली ताकद


भुसावळ : ठरल्याप्रमाणे भुसावळातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह 16 विद्यमान व सहा माजी नगरसेवक-सेविकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अनेक नगरसेवक भाजपातून निवडून आले असून माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काही नगरसेवक अपक्ष तसेच जनाधार विकास पार्टीतून निवडून आले होते मात्र आता ते राष्ट्रवादीमय झाले असून नाथाभाऊंच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
प्रवेश केलेल्यांमध्ये नगरसेवक मुकेश पाटील, नगरसेवक प्रमोद नेमाडे, नगरसेवक किरण कोलते, नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी, नगरसेवक अमोल इंगळे, नगरसेविका शैलजा नारखेडे, नगरसेविका प्रतिभा पाटील, नगरसेविका लक्ष्मी मकासरे, नगरसेविका सविता अहिरे, नगरसेविका अरुणा सुरवाडे, नगरसेविका पूजा राजू सूर्यवंशी, नगरसेविका शेख रईदा शेख शफी, नगरसेविका मेघा वाणी, नगरसेविका शोभा अरुण नेमाडे, नगरसेविका सुषमा किशोर पाटील, नगरसेविका संगीता प्रदीप देशमुख तसेच माजी उपनगराध्यक्ष शेख शफी शेख अजीज, माजी नगरसेवक पुरूषोत्तम नारखेडे, माजी नगरसेविका हेमलता मनोहर इंगळे, माजी नगरसेवक वसंत पाटील, माजी नगरसेवक बापू महाजन, देवा वाणी, दिनेश नेमाडे, माजी नगरसेविका शालिनी कोलते, भारती रमण भोळे, पौर्णिमा नेमाडे, प्रीती मुकेश पाटील, रोहन राजू सूर्यवंशी, प्रिया बोधराज चौधरी, सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील, अनिकेत पाटील, पोलिस पाटील मधुकर पाटील, ज्योती सपकाळे, आसीफ मुन्ना तेली, प्रा.जतीन मेढे, निलेश रायपुरे, सरजु तायडे, संघरत्न सपकाळे, सुरेखा सरजु तायडे, आशा चौधरी, रवींद्र झोपे, संगीता माकुणे, संदीप शिरतुरे, जितेंद्र सपकाळे, खडका सरपंच विलास सपकाळे यांच्यासह सावदा नगराध्यक्षा अनिता येवले, उपनगराध्यक्ष विश्वास चौधरी, गटनेता अजय भारंबे, नगरसेविका करुणा पाटील, नंदा लोखंडे, जयश्री नेहते, सगीरा बी.सैय्यद, शबाना तडवी यांच्यासह विभागातील भुसावळ विभागातील पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.



भुसावळातील गुंडगिरी ठेचून काढा : अजित पवार 

यांची व्यासपीठावर उपस्थिती
या कार्यक्रमास विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री डॉ.सतीश अण्णा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, पाचोर्‍याचे माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, माजी आमदार मनीष जैन, चाळीसगाचे माजी आमदार राजीव देशमुख, पाचोर्‍याचे माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा बँक माजी अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील, जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, एजाज मलिक, जि.प.चे माजी सदस्य संजय गरूड (शेंदुर्णी), भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, अशोक लाडवंजारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी तर आभार माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी मानले.

आमदार संजय सावकारे म्हणाले ; अजित दादा, पुन्हा-पुन्हा भुसावळात या ! 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !