छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : संतप्त शिवसैनिकांकडून वाहनांची तोडफोड
मिरज : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई फेकल्याची घटना कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु येथे घडली व या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्रभर त्याचे उमटू लागले आहेत. शनिवारी सकाळी मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी बस स्थानक परीसरात एकत्र येऊन कर्नाटक गाड्या जाणार्या फोडल्या. या परीसरात असलेल्या हॉस्पिटलवरील कर्नाटक अक्षरातील बोर्ड ही शिवसैनिकांनी दगड मारून फाडले.
शिवसैनिकांना घेतले ताब्यात
याप्रकरणी मिरज गांधी चौकी पोलिसांनी चंद्रकांत मैगुरे, विजय शिंदे, महादेव हूलवान, अतुल रसाळ, पप्पू शिंदे, गजानन मोरे, दिलीप नाईक, प्रकाश जाधव, किरण कांबळे, यांना घटनास्थळवरून ताब्यात घेतले. कर्नाटकमधून आलेल्या तीन गाड्या शिवसैनिकांनी फोडल्या. त्यापैकी दोन गाड्या गांधी चौकी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या.




युवराज संभाजीराजे छत्रपतींनी नोंदवला निषेध
बंगळुरू येथील घटनेचा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी कडक शब्दांत निषेध नोंदवलाय. दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की,
संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी!