नैराश्य आल्याने एमपीएससीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या


पुणे : एमपीएससीची पूर्व परीक्षेेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्याला नैराश्याने ग्रासल्याने त्याने आत्महत्या केली. मल्हारी नामदेव बारवकर (25 रा. देऊळगाव गाडा ता.दौंड जि. पुणे ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान त्याच्या परीक्षेच्या तयारीसाठी पैसा कमी पडू नये म्हणून वडिलांनी आपली जमीन विकल्याचे समोर आले.

नैराश्याने ग्रासले
मल्हारी हा एमपीएससीची पूर्वपरीक्षेेची दिवसरात्र तयारी करत होता. त्याने दोन-तीन परीक्षेचे पेपरही दिले होते. मात्र, याच काळात आलेल्या नैराश्यातून राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मल्हारी यांचे नातेवाइकांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
आत्महत्या करण्यापूर्वी मल्हारी याने लिहून ठेवलेली एक चिट्ठी पोलिसांना सापडली आहे. मी तुम्हाला दाखवलेली स्वप्न पूर्ण करू शकत नाही आणि तुमचे पडलेले चेहरे पाहू शकत नाही. माझ्या आत्महत्येस कोणी जबाबदार नाही. अतिविचार, संपलेला आत्मविश्वास, भविष्यातही काही सकारात्मक दिसत नाही. चांगले जगण्याच्या सगळ्या आशा संपल्या आहेत, असे यात नमूद असल्याचे सांगण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !