गुजरातमध्ये मोठी कारवाई : 400 कोटींचे हेरॉईन जप्त
गांधीनगर : भारताच्या जल हद्दीत सहा चालकांसह पाकिस्तानी नौका ताब्यात घेण्यात आली असून त्यातील तब्बल 400 कोटी रुपयांचे हेरॉइन (Heroin) जप्त करण्यात आल्याने देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. गुजरातमध्ये भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएस यांनी संयुक्त कारवाई केली. अल-हुसैनी नावाची पाकिस्तानी नौका (Pakistan Boat) असून अधिकार्यांना गस्त घालत असताना गुजरात किनारपट्टीजवळ ही पाकिस्तानी नौका दिसताच कारवाई करण्यात आली. तब्बल 77 किलो हेरॉइन जप्त झाले असून आंतरराष्ट्रीय बाजारानुसार याची किंमत 400 कोटी रुपये इतकी आहे.
-
पालकमंत्र्यांच्या आक्षेपार्ह विधानावर सिने अभिनेत्री हेमा मालिनी म्हणाल्या…!
जाखाऊ किनारपट्टीवर आणली बोट
पकडण्यात आलेल्या पाकिस्तानच्या या बोटीचे (Pakistan Boat) नाव ‘अल हुसेनी’ असे आहे. या बोटीत सहा क्रू सदस्य होते. भारतीय जलक्षेत्रात ही बोट पकडण्यात आल्याची माहिती संरक्षण जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे. पुढील तपासासाठी ही बोट गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर आणण्यात आली असल्याची माहितीही अधिकार्यांनी दिली आहे. जनसंपर्क अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या पाकिस्तानच्या या मासेमारी करणार्या बोटीतून रविवारी रात्री 77 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत तब्बल 400 कोटी रूपये आहे.




यापूर्वी 15 कोटींचे ड्रग्ज जप्त
यापूर्वी 15 सप्टेंबर रोजी गुजरातमध्येच अदानी समूहाकडे मालकी असलेल्या मुंद्रा पोर्टवरुन तीन हजार किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. अफगाणिस्तानवरुन दोन कंटेनरच्या माध्यमातून आलेलं हिरॉईन (ड्रग्ज) (Heroin) हे तब्बल 15 हजार कोटी किंमतीचे असल्याचं सांगितलं जात आहे. ही कारवाई केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या डीआरआय आणि कस्टम विभागाच्या वतीनं 15 सप्टेंबरला करण्यात आली होती. दोन कंटेनरमधून भरुन आलेल्या या कंटेनरमधून टॅल्कम पावडर आणण्यात येत आहे अशा प्रकारची कागदपत्रे रंगवण्यात आली होती. हे दोन्ही कंटेनर अफगाणिस्तानच्या हसन हुसेन लिमिटेड या कंपनीने निर्यात केले असून ते आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका कंपनीने मागवल्याची माहिती समोर आली होती.