भुसावळातील रेल्वे विस्थापीतांचा प्रस्ताव तातडीने सादर करावा

रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय बाबूराव साळवे यांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन


भुसावळ : शहरातील रेल्वे हद्दीतून विस्थापीत झालेल्या सहा हजार नागरीकांना घरकुल मिळण्यासंदर्भातील सुधारीत प्रस्ताव जळगाव जिल्हाधिकारी व शासनास पाठवण्यात यावा, अशी मागणी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय बाबूराव साळवे यांनी पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे केली आहे. निवेदनाचा आशय असा की, भुसावळात नुकतेच विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वेतून बेघर झालेल्या घरकुल बांधून देण्याची ग्वाही दिली असून त्या संदर्भात सुधारीत प्रस्ताव पाठवावा, असेही सभेत सूचवले होते. भुसावळ पालिकेच्या बैठकीत या संदर्भात ठरावा, अशी मागणी विजय साळवे यांनी केली आहे. शहरातील राहुल नगरातील सर्वे क्रमांक 63/1 गुरुचरण या शासकीय जमिनीवर सहा हजार घरे बांधण्यासंदर्भात सुधारीत प्रस्ताव पाठवण्यात यावा, असेही निवेदनात नमूद आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !