जळगावात कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी


जळगाव : शहरातील सिंधी कॉलनीत चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात 2 सप्टेंबर रोजी घडला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चारचाकीवरील चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

उपचारानंतर दिली तक्रार
जळगाव शहरातील शिवाजी नगरातील भुरे मामलेदार प्लॉटजवळ सत्यनारायण शंकरराव चव्हाण (49) हे वास्तव्यास आहेत. सत्यनारायण चव्हाण हे 2 सप्टेंबर रोजी त्यांच्या दुचाकी (एम.एच.19 डी.डी. 6835) ने सिंधी कॉलनी परीसरातून जात असताना पोलिस चौकीसमोर चारचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.यात सत्यनारायण चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचारानंतर तब्बल साडेतीन महिन्यांनी सत्यनारायण चव्हाण यांनी याप्रकरणी गुरुवार, 23 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यावरुन चारचाकी चालक विशाल राधेश्याम शिंपी (पाळधी, ता.धरणगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !