गोपाळपूरा येथून दोन शेळ्यांसह बोकडाची चोरी
जळगाव : शहरातील गोपाळपुरा येथे घराजवळ बांधलेल्या दोन शेळ्या व एक बोकड असे 16 हजार 500 रुपयांचे पशुधन चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरीमुळे उडाली खळबळ
गोपालपूरा येथील भोलेनाथ मंदिर पुलाजवळ शीला नागराज सपकाळे (40) या वास्तव्यास आहेत. मोलकरीण म्हणून काम करून त्या उदरनिर्वाह भागवतात. रविवार, 19 डिसेंबर रोजी रात्री शीला सपकाळे यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे असलेल्या शेळ्या व बोकड घराजवळ बांधले असता मध्यरात्री चोरट्यांनी ते चोरून नेले. याबाबत गुरुवार, 23 डिसेंबर रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार मनोज इंद्रेकर करीत आहेत.




