फुलगावसह तळवेल, वराडसीम, जाडगावात अपक्ष उमेदवार सतीश घुलेंची प्रचार रॅली


मतदारांशी साधला संवाद : परीवर्तनासाठी मागितला कौल

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश भिका घुले यांनी शहर व ग्रामीण भागात जोरदार प्रचार चालवला आहे. शहरातील स्थानिक व्यापारी तसेच मतदारांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी मंगळवारी दुपारी तालुक्यातील फुलगावसह तळवेल, वराडसीम, जाडगावातील मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी उमेदवार घुले यांनी परीवर्तनासाठी आपली उमेदवारी असल्याचे सांगत मतदारांकडे कौल मागितला. याप्रसंगी त्यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. ठिकठिकाणी सुवासिनींनी त्यांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वादही दिले.




यांचा होता सहभाग
अपक्ष उमेदवार सतीश घुले यांच्या प्रचार रॅलीत प्रशांत बर्‍हाटे, महेश जाधव, किशोर कोलते, राजेश चौधरी, सुनील रायकवार, दिलीप टाक, निलेश इंगळे, विवेक गवळी, जमील बागवान, अजय ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !