गौण खनिज प्रकरणात विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार : आमदार चंद्रकांत पाटील


रावेर : मध्यप्रदेशातील गौण खनिज परवान्यावर महाराष्ट्राच्या हद्दीत वाहतुकीचे ट्रॅक्टर ट्रॉली पकडण्यात आल्यानंतरही महसूल विभागाकडून कोणताही दंड न घेता वाहने सोडून दिले जात असल्याचे प्रकार तालुक्यात घडत असल्याने या संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना सांगितले.

रावेर तालुक्यात अवैध गौण खनिजाचा मुद्दा ऐरणीवर
रावेर व मुक्ताईनगर तालुके मध्यप्रदेश सीमेलगत तसेच तापी नदीला लागून आहे. दोन्ही तालुक्यांमध्ये अवैध वाळूची वाहतूक जोमाने सुरू असून महसूल विभागातर्फे ट्रॅक्टर-टॉली किंवा डंपरवर कारवाई केल्यास संबधीत ट्रॅक्टर मालक मध्यप्रदेश राज्याची गौण खनिज वाहतुकीचा परवाना आणतात त्यामुळे महसूल विभाग दंड न घेता गौण खनिज प्रकरणात जप्त टॅक्टर ट्रॉली सोडून देत असल्याने हा पॅटर्न तालुक्यात नवा सुरू झाल्याने प्रशासनाचीदेखील डोकेदुखी वाढली आहे. या गंभी प्रकारामुळे राज्य शासनाच्या महसुलावरही मोठा परीणाम होत आहे. या प्रकरणात आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घातले असून ते अधिवेशनात या संदर्भात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.







दंड वाचविण्यासाठी धडपड
मध्य प्रदेशाकडून दिल्या जाणार्‍या पावत्या बोगस असून अवैध वाळू वाहतूकदार दंड वाचविण्यासाठी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात या पावत्यांचा वापर करतात. यापूर्वी मध्य प्रदेशच्या गौण खनिज पावत्यांवर रस्ता अस्तित्वात नसताना पावत्या आणून रावेरात जप्त असलेले ट्रॅक्टर-टॉलीवर दंड न होण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे प्रकार उघड झाले आहे. या सर्व प्रकारात मात्र आता दोन्ही तहसीलच्या अडचणी वाढू शकतात, अशी चर्चा आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !