माजी मंत्री एकनाथराव खडसे व अॅड.रोहिणी खडसेंपासून आपल्या जीवाला धोका : आमदार चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कन्या अॅड.रोहिणी खडसे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप शनिवारी मुक्ताईनगरचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात आमदारांनी शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार केली.
तर महाविकास आघाडीतही पडणार फूट
जळगावात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी खडसे पिता-पुत्रीवर आमदार पाटील यांनी गंभीर आरोप केले. भाजप आणि शिवसेनेतील युतीत एकनाथराव खडसे यांनी फूट पाडल्यानंतर आता महाविकास आघाडीतही तेच फूट पाडतील, असा धक्कादायक आरोपदेखील तयांनी केला.


मी आमदार झाल्यापासून डोईजड
आमदार पाटील म्हणाले की, मी आमदार झाल्यापासून खडसे पिता-पुत्रीला डोईजड होत असल्याचे वाटत असल्याने त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रचंड घृ्रणा निर्माण झाली आहे. ते केव्हा माझा घातपात करतील ? हे सांगता येत नाही. मी आणि माझे कुटुंबीय यांच्यापासून असुरक्षित आहे. याबाबत मी पोलीस अधिक्षकांना सांगितले असून मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याची माहिती त्यांनी जळगावातील माध्यमांना दिली.
दोन्ही बाजूने तक्रार दाखल
आमदार पाटील पुढे म्हणाले, अॅड.रोहिणी खडसे यांना काल घडलेल्या प्रकारात केवळ त्यांच्याच पक्षातील महिलेवरील अन्याय दिसतो आहे. कालच्या प्रकारात दोन्ही बाजूने महिलांची तक्रार दाखल आहे. घटना काय ते पोलिस तपासात निष्पन्न होईल पण त्यानिमित्ताने खर्या अर्थाने गुंड कोण हे तुमच्या लक्षात आले असेल. एखाद्या लोकप्रतिनिधीला चोप देऊ, अशी भाषा गुंडगिरीची असू शकते. मी यापूर्वी देखील सांगितले आहे की, यांची द्वेषबुद्धी, यांनी द्वेष भावनेतून केलेल्या कारवाया, खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती, माझ्यावर यापूर्वी देखील यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्यांनी खदखद बोलून दाखवली असून केव्हा हे एकदाचे आमदाराला निपटून टाकता असे झाले आहे.
शांततेत द्यायला हवा संदेश
आमदार पाटील म्हणाले, एखाद्या लोकप्रतिनिधीने समाजाला संदेश द्यायचा असेल तर शांततेचा संदेश द्यायला हवा. असे चोपणे -चापण्याची भाषा त्यांच्या तोंडून शोभत नाही. महिलांवर अन्याय करणार्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही पाठीशी घालणार नाही. घटना खरी की खोटी हे कळू द्या, घाई कशाला करतात. खडसे आणि त्यांच्या कन्या यांना कोण ओळखत नाही. त्यांच्या एका फोनवरदेखील गुन्हा दाखल होईल. त्या रात्री तीन वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात बसून होत्या. त्यांनी काय गोंधळ घातला हे सर्वांनी पाहिले असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.
बोदवडनंतर मुक्ताईनगरात पेटला आखाडा : शिवसेना-राष्ट्रवादी पदाधिकार्यांविरोधात गुन्हे
तर महाविकास आघाडीतही पडणार फूट
जळगावात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी खडसे पिता-पुत्रीवर आमदार पाटील यांनी गंभीर आरोप केले. भाजप आणि शिवसेनेतील युतीत एकनाथराव खडसे यांनी फूट पाडल्यानंतर आता महाविकास आघाडीतही तेच फूट पाडतील, असा धक्कादायक आरोपदेखील तयांनी केला.
