खून प्रकरणातील गुंडांचा पोलिस पथकावर गोळीबार : कुरवंडी गावातील घटना
पिंपरी : सांगवी परीसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या योगेश जगताप हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर गुंड प्रवृत्तीच्या आरोपींनी गोळीबार केल्याने सर्वत्र मोठी खळबळ उााली आहे. अर्धा तास चाललेल्या चकमकीनंतर आरोपींना पकडण्यात यंत्रणेला यश आले आहे. चाकण जवळील कुरवंडी गावात ही घटना घडली.
वर्चस्व वादातून योगेश जगताप यांची हत्या
योगेश रवींद्र जगताप (36, रा. पिंपळे गुरव) यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. पिंपळे गुरव येथे 18 डिसेंबर रोजी सकाळी ही घटना घडली होती. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या मागावर पोलिसांची विविध पथके रवाना झाली होती. दरम्यान यातील आरोपी खेड तालुक्यात चाकण जवळील कुरळी गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथके कुळीत दाखल झाली. यावेळी आरोपींनी गोळीबार केला.

चार पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त
चाकणमधील कुरवंडी गावात हे आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आयुक्तालयातील चार पथकांनी तात्काळ हालचाली करत त्यांना पकडण्याची कारवाई केली. पोलिस पकडण्यासाठी गेल, असता मुख्य आरोपी गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण आणि त्याचा साथीदारांनी पोलिसांवर केली फायरींग केली. मात्र पोलिसांना त्यांना ताब्यात घेण्यात यश आले . यावेळी पोलिसांनी चार पिस्टलसह तीन जिवंत काडतुस आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.
गोळीबारात पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश जखमी
पिंपरी चिंचवडमधील योगेश जगताप हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकारी व पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर आरोपींनी गोळीबार केल्य पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले तर अन्य एक कर्मचारी जखमी झाल्याची चर्चा आहे.
वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने हत्या
सांगवीतील काटेपुराम चौकात सकाळी साडेदहा व्यवसायीक योगेश जगताप यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या हल्ल्यात व्यावसायीक योगेश यांनी पळण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोरांनी झाडलेल्या सहा गोळ्यातील दोन गोळ्या त्यांना लागल्या यात जगताप गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आरोपी यांनी जगताप यांच्यावर जुन्या भांडणाचा राग उकरून काढत हल्ला केला. यामध्ये पोलिसांनी गणेश मोटे व अश्विन चव्हाण या दोघांसह 11 जणांवर गुन्हा दाखल केला होता.
