साखर कारखान्याच्या माजी संचालकाकडे दरोडा : लाखोंच्या सोन्यासह रोकड लांबवली
पुणे : साखर कारखान्याच्या माजी संचालकाच्या बंगल्यावरच दरोडा टाकून दरोडेखोरांनी दीड लाखांची रोकड तसेच चांदी व 15 तोळे सोने लुटल्याची घटना इंदापूर तालुक्यात घडली.
सहा दरोडेखोरांचा धुमाकूळ
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या बंगल्यावर दरोडेखोरांनी रात्री दरोडा टाकला. रत्नपुरीत जवळील गायकवाड वस्ती इथं राजेंद्र गायकवाड यांचा बंगला आहे. त्यांच्या ‘आशा’ नावाच्या बंगल्याचं दार तोडून रात्री एकूण सहा दरोडेखोर बंगल्यामध्ये शिरले. राजेंद्र यांनी लाकडी काठीनं दरोडेखोरांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला मात्र दरोडेखोरांनी धारधार शस्त्रांनी राजेंद्र गायकवाड यांच्या कपाळावर जोरदार प्रहार केला. यात राजेंद्र गायकवाड हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्या कपाळाला गंभीर जखम झाली.

