चाळीसगावातील लाचखोर कंत्राटी डॉक्टरांची पोलिस कोठडीत रवानगी


जळगाव : 60 हजारांच्या लाच प्रकरणी चाळीसगावातील 108 रुग्णवाहिकेवरील कंत्राटी बीएएमएस डॉक्टर मुश्ताक मोतेबार सैय्यद (घाट रोड, चौधरीवाडा, चाळीसगाव) यांना सोमवारी अटक करण्यात आली होती. दुसर्‍या दिवशी मंगळवारी संशयीत डॉ.सैय्यद यांना जळगाव न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

खाजगी रुग्णालयात स्वीकारली होती लाच
चाळीसगावातील 29 वर्षीय तक्रारदार यांच्या दोन अँम्बुलन्स (रुग्णवाहीका) असून कोरोना काळात कोरोना रुग्ण चाळीसगाव तालुक्यातील गाव-खेड्यातून तसेच चाळीसगाव येथुन जळगाव येथे ने-आण करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर, चाळीसगाव येथे भाडे तत्वावर लावण्यात आल्या होत्या. या रुग्णवाहिकांच्या सेवेच्या मोबदल्यात शासनाकडून बिल मिळणार असून या बिलांची पडताळणी करून त्याबाबत वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव यांचे सही-शिक्यानिशी लागणारे पत्र वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर, चाळीसगाव यांच्याकडून पडताळणी करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी 108 रुग्णवाहिकेवरील कंत्राटी डॉ.मुश्ताक मोतेबार सैय्यद यांनी सोमवारी लाच मागितली होती. एसीबीकडे तक्रार केल्यानंतर लाचेची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. डॉक्टरांनी लाच स्वीकारताच सोमवारी रात्री त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.





दोन दिवसांची पोलिस कोठडी
कंत्राटी बीएएमएस डॉक्टर मुश्ताक मोतेबार सैय्यद (घाट रोड, चौधरीवाडा, चाळीसगाव) यांना मंगळवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकारात अन्य कुणाचा सहभाग आहे तसेच अशा पद्धत्तीने आणखी कुणाकडून लाच स्वीकारण्यात आली? आदी बाबींचा पोलिस कोठडीत उलगडा होणार आहे. तपास जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकारी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !